प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात भाजप विरोधातील लढाई तीव्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भरण-पोषण सुरू आहे. ते भाजपपेक्षा शेतकरी कमगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी या पक्षांमधून सुरू आहे. मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे पण सध्या भाजपमध्ये असलेले परभणीचे नेते माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.Political support of NCP from PWD, MNS, deprived front, RPI for fighting BJP
त्यांच्याबरोबर वर्धा, परभणी, पुणे, नांदेड या शहरांमधील वर उल्लेख केलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका असून भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर कितीही मोठी व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीपुढे मोठ्या व्यक्तीचा करिष्मा टिकत नाही. उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात भाजपमधून मंत्री, आमदार बाहेर पडत आहेत. महाराष्ट्रात देखील लवकरच भाजपमधून अनेक आमगार बाहेर पडतील, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशा व्यक्त करतो. pic.twitter.com/XFfnndemI8 — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2022
परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशा व्यक्त करतो. pic.twitter.com/XFfnndemI8
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2022
ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तोंडी तोफा डागत प्रत्यक्षात पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष फोडून त्या पक्षाचे नेते तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले, आज त्याच पद्धतीने शरद पवार यांनी भाजपला राजकीयदृष्ट्या टार्गेट केले, परंतु प्रत्यक्षात शेतकरी कामगार पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी यांचे पदाधिकारी सामील करून घेतले आहेत.
अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील आणि राज्याच्या विधिमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले. घरोघरी प्रागतिक विचार पोहचवण्यात ते यशस्वी झाले होते. pic.twitter.com/AF8fPXCLnf — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2022
अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील आणि राज्याच्या विधिमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले. घरोघरी प्रागतिक विचार पोहचवण्यात ते यशस्वी झाले होते. pic.twitter.com/AF8fPXCLnf
वर्ध्यातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुण्याच्या आरपीआयच्या नेत्या श्रद्धा साठे, प्रदीप साठे तसेच नांदेडचे बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पैठणमधील कार्यकर्ते किशोर दसपुते यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा. एक काळ असा होता १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेस सोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. pic.twitter.com/nEFRroA2kq — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2022
परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा. एक काळ असा होता १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेस सोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. pic.twitter.com/nEFRroA2kq
भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार विजयराव गव्हाणे हे मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते. त्यांचे वडील कै. अण्णासाहेब गव्हाणे हे शेतकरी कामगार पक्षाचे परभणीतून आमदार होते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे परभणीत काँग्रेस पक्ष प्रभावी होता. परंतु, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने त्या जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव तयार केला होता.
अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यावेळी कार्यरत होती, याची आठवण शरद पवार यांनी आपल्या ट्विट मधून करून दिली आहे. भाजप विरोधात लढाई करत असताना प्रत्यक्षात पवारांनी शेकाप, वंचित बहुजन आघाडी, मनसे आरपीआय या पक्षातले नेते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेतले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App