प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड मधले भाजपचे नगरसेवक फोडत आहेत, अशा बातम्या आहेत. आम्ही ढोल वाजवत नाही. शांतपणे काम करतो. नगरसेवक अपात्र ठरणार नाहीत, अशा पद्धतीने आमच्याकडे यावेत असे विधान अजित पवार यांनी काल केले होते.Political fight in PCMC between ajit pawar and chandrakant patil
त्या विधानाला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजित दादांनी स्वतःला एवढे संकुचित करून घेतले आहे किती की ते फक्त पिंपरी-चिंचवड मध्येच ॲक्टिव दिसतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा करतात.
ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे असा प्रश्न पडतो, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला. कोरोना काळात अजितदादा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आले. पण ते कधी मराठवाडा-विदर्भात गेल्याचे दिसले नाहीत. त्यांनी स्वतःला एवढे संकुचित का करून घेतले आहे??, असा खोचक सवालही चंद्रकांतदादांनी केला.
ज्या नगरसेवकांना जायचे आहे ते जाऊ शकतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर निवडून आले आहेत. त्यांच्यावर जनतेचे फार प्रेम आहे म्हणून ते निवडून आलेले नाहीत. एकदा भाजपच्या बाहेर गेलात की मागे येण्याचे दरवाजे बंद आहेत, असा इशारा देखील चंद्रकांत दादांनी पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या नगरसेवकांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App