पीएनबी बँक घोटाळा :  मालमत्ता जप्त का करू नये? : न्यायालय ; नीरव मोदीला कारणे दाखवा नोटीस बजावली


वृत्तसंस्था

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आणि आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून भारतातील मालमत्ता जप्त का केली जाऊ नये, असे विचारले आहे. PNB Fraud : why not seal your property : Court Asked to Nirav Modi and Issued notice also

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी नीरव मोदीला ११ जूनला न्यायालयात हजर राहण्यास समन्स बजावले आहे. तो न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्याच्याविरोधात फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई सुरू होणार आहे.



अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीनंतर डिसेंबर २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने मोदी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. आता नीरव मोदीच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावून मालमत्ता जप्तीचे आदेश का देऊ नयेत, असे विचारले आहे.

PNB Fraud : why not seal your property : Court Asked to Nirav Modi and Issued notice also

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात