विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहूल चोक्सी व गीतांजली ग्रुपशी संबंधित सुमारे 15 कोटींच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.action against Mehul Choksi property
या मालमत्तांमध्ये मुंबईतील गोरेगाव येथील आलिशान फ्लॅट, मौल्यवान वस्तू, मर्सिडीज कार यांचा समावेश आहे. गोरेगाव येथील 1460 चौरस फुटांच्या फ्लॅटवर टाच आणण्याचे आदेश जारी केले आहेत.
त्याशिवाय सोने व प्लॅटिनमचे दागिने, हिरे, मेती व चांदीचे दागिने, मर्सिडीज कार, महागडी घड्याळे यांचा समावेश आहे. या मालमत्ता गीतांजली ग्रुप ऑफ कंपनी व त्यांचे संचालक मेहूल चोक्सी यांच्याशी संबंधित आहेत.
चोक्सीने 7080.86 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यापूर्वीच 2550 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यानंतर आता 14 कोटी 45 लाखांच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली आहे