प्रतिनिधी
मुंबई : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमदाराला धमकीचे पत्र मिळाले असून, त्यात ‘आय लव्ह पीएफआय’ असे लिहिले आहे. ही धमकी पीएफआय या प्रतिबंधित संघटनेकडून आली असल्याचा दावा विजय कुमार यांनी केला आहे.PFI Threat letter to BJP MLA; Wrote – We will bomb in Kashi-Ayodhya, Prime Minister is also on target
विजय कुमार यांचे शीर शरीरापासून वेगळे केले जाईल, असे पत्रात लिहिले आहे. एक दिवस मथुरा, काशी आणि अयोध्येत बॉम्बस्फोट होतील, असा दावाही करण्यात आला आहे. पीएम मोदी आणि अनेक बडे नेते त्यांच्या रडारवर असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
पीएफआयविरोधात तक्रार दाखल
विजय कुमार देशमुख हे सोलापूरचे भाजपचे आमदार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय कुमार यांनी पीएफआय नेते मोहम्मद शफी बिराजदार यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पीएफआयवरील बंदीचा राग आल्याने बिराजदार यांनी शिरच्छेद करण्याची धमकी दिल्याचा दावा आमदाराने केला आहे.
बिराजदारने अयोध्या राम मंदिर, मथुरेतील कृष्ण मंदिर आत्मघातकी हल्लेखोरांनी उडवून देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पत्रात काय लिहिले?
सरकारने पीएफआयवर बंदी घालून योग्य काम केले नाही, आता त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे या पत्रात लिहिले आहे. काफिर आता तुमचं काय होणार? तुमच्या सरकारने यापूर्वी आमच्या सिमी संघटनेवरही बंदी घातली होती (2001 मध्ये सरकारने बंदी घातली होती). त्याचा परिणाम काय झाला? तुम्ही आमच्या सारख्या नागावर पाय ठेवलात. आता मुलं घरोघरी गप्प बसणार नाहीत. कसाब, अफजल, युसूफ, याकूब प्रत्येक घरातून बाहेर पडतील. भाजप आमदाराला मिळालेल्या या पत्राची पोलीस चौकशी करत आहेत.
पीएफआयने पाटणा येथील मोदींच्या रॅलीला केले होते लक्ष्य
22 सप्टेंबर रोजी एनआयए-ईडीने ऑपरेशन ऑक्टोपस अंतर्गत पीएफआयच्या 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये 12 जुलै रोजी पाटण्यातील पंतप्रधानांच्या सभेवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, त्यातही शफीक पायथेची फंडिंग होती.
मीडिया रिपोर्टनुसार, तपास यंत्रणेने सांगितले की, संघटनेने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरही उभारले होते, जेणेकरून 2013 सारखी घटना घडवून आणता येईल. ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा गांधी मैदानावर तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या सभेत साखळी बॉम्बस्फोट झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App