पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास परवानगी ; वाईन शॉपचा उल्लेख नाही

वृत्तसंस्था

पुणे : पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. परंतु वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही. Permission to supply liquor by parcel from bar-restaurant in Pune; Not to mention the wine shop

नागरिक बारमध्ये फोन करून किंवा ॲपद्वारे मागणी करू शकतात. पुरवठ्याची व्यवस्था बारने करायची आहे. महापालिकेच्या नऊ एप्रिलपर्यंत आदेशात वाईन शॉपचा उल्लेख होता, परंतु बुधवारच्या आदेशात हा उल्लेख नाही.उत्पादन शुल्क विभागाने ‘एमआरपी’नुसारच मद्य पार्सल देण्याच्या सूचना बारचालकांना दिल्या आहेत. यासोबतच सोबत परमिट पास, ओळखपत्र आणि पुरवठा करण्यासाठी घरी जाणाऱ्याकडे नोकरनामा बाळगण्याच्या सूचनाही आहेत.

नागरिक अॅपद्वारे किंवा थेट बारमध्ये दूरध्वनीद्वारे फोन करून ‘ऑर्डर’ देऊ शकणार आहेत. त्यांना परमिट विकत घेणे आवश्यक आहे. नियम व निकषांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

पुणे महापालिकेने ९ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार वाईन शॉपनाही होम डिलिव्हरीसाठी परवानगी असल्याचे म्हटले हाेते. त्याप्रमाणे त्यांनी होम डिलीव्हरी सुरू केली होती.

Permission to supply liquor by parcel from bar-restaurant in Pune; Not to mention the wine shop