विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न टाकलेल्या राजकीय पावलावर उद्या देवेंद्र फडणवीस पाऊल टाकणार आहेत…!! शरद पवार जसे सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे जाणार होते, तसे उद्या देवेंद्र फडणवीस मात्र प्रत्यक्षात मुंबई पोलिसांकडे जाणार आहेत. Pawar – ED – Fadanavis – police
– ईडीची न आलेली नोटीस
शरद पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात प्रत्यक्ष ईडीची नोटीस आली नव्हती. पण ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी ईडीची नोटीस आली नसताना शरद पवार यांनी मी स्वतःच उठून ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करून घेतो, असे जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली होती.
शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करून घेणार आणि कायदा व्यवस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार, अशी भीती त्यावेळच्या पोलिसांना वाटली. कारण शरद पवार यांना न आलेल्या ईडीच्या नोटिशीचा निरोप महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांनी मुंबईत ते करण्याची तयारी चालवली होती.
– झाकली मुठ सव्वा लाखाची
या पार्श्वभूमीवर अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे शरद पवार यांना स्वतः “सिल्वर ओक” येथे जाऊन भेटले आणि ईडीची नोटीस त्यांना आलेले नाही तर त्यांनी ईडी मच्या कार्यालयात जाऊ नये. ते गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी विनंती केली होती. पोलिस आयुक्तांची विनंती मान्य करून शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन देखील “झाकली मुठ सव्वा लाखाची” राहिली होती.
– फडणवीस मात्र जाणार
उद्या मात्र देवेंद्र फडणवीस मुंबई पोलिसांना उत्तर देण्यासाठी बीकेसी सायबर ठाण्यात जाणार आहेत. तेव्हा बीकेसी परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वतः त्याची माहिती दिली आहे.
– भाजपचे शक्तिप्रदर्शन
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे, की मुंबई पोलिसांनी आपल्याकडे बदली घोटाळ्याची माहिती कशी आली? ती जाहीर का केली? ती जाहीर करणे हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे, याचे उत्तर द्या अशी नोटीस पाठविल्याची माहिती दिली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता बीकेसी सायबर ठाण्यात दाखल होणार आहेत. यावेळी भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन करायचे ठरवले आहे.
नोटीस न देता जर शरद पवार ईडीच्या कार्यालयात जात असतील आणि राष्ट्रवादी त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करून घेत असेल तर आपण का मागे राहायचे??, असा विचार भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्यावेळी शरद पवार ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन झाले नाही. पण उद्या मात्र देवेंद्र फडणवीस हे बीकेसीच्या सायबर ठाण्यात जाणार आहेत. त्यामुळे भाजपचे शक्तिप्रदर्शन होणार आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App