Fadanavis pendrive Bomb : रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा प्रवीण चव्हाणांचा दावा; फॉरेन्सिक ऑडिट तयार; फडणवीसांचे प्रत्युत्तर!!


प्रतिनिधी

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर 4 दिवस “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आज “अचानक” प्रकट होऊन संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये मॅनिप्युलेशन झाले असल्याचा दावा केला आहे. Fadanavis pendrive Bomb pravin chavan forensic audit

मात्र या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर देत संबंधित रेकॉर्डिंगचे फॉरेन्सिक ऑडिट माझ्याकडे तयार आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांच्या दाव्यातली एक प्रकारे हवाच फडणविसांनी पहिल्याच झटक्यात काढून घेतली आहे.

पेन ड्राइव्हबॉम्ब फोडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे 125 तासांचे व्हिडीओ फुटेज आणि रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला होता. त्यातले 2 तास 36 मिनिटांचे रेकॉर्डिंग महाराष्ट्र भाजपने जारी केले होते. त्याच मुद्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार घमासान सुरू आहे. मंगळवारी 8 मार्च रोजी फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे किरकोळ प्रतिक्रिया व्यक्त करून “गायब” झाले होते.

त्यानंतर चार दिवसांनी ते आज “अचानक” एबीपी माझा समोर “प्रकट” झाले आणि त्यांनी संबंधित व्हिडिओ रेकॉर्डिंग तेजस मोरे नावाच्या एका गुन्हेगाराने केल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने आणि सरकारी वकिलांनी कोणतेही नॅरेटिव्ह तयार केले तरी माझ्याकडे 125 तासांचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्याचे फॉरेन्सिक ऑडिट मी केले आहे. त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. योग्य वेळ येताच ते 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याखेरीज अन्य पुरावे मी सीबीआयकडे देणार आहे. राज्य सरकारने संबंधित केस सीबीआयकडे सोपवावी. कारण राज्यातले काही पोलिस अधिकारी यात गुंतले आहेत. त्यामुळे राज्य सरकार यांची चौकशी करू शकत नाही आणि तरीही राज्य सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपविले नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टातून सीबीआयकडे ही चौकशी सोपवायला लावू. 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग आणि बाकीचे सर्व पुरावे आम्ही कोर्टात सादर करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

125 तासांचे रेकॉर्डिंग केंद्रीय यंत्रणांच्या हस्तक्षेपा शिवाय शक्य नाही. ते जर खरे असेल आणि केले असेल तर मी त्यांचे कौतुक करतो, असे खोचक उद्गार शरद पवार यांनी काढले होते. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या आजच्या वक्तव्यातून शरद पवार यांच्याच वक्तव्याला छेद गेला आहे. कारण संबंधित रेकॉर्डिंग हे आपल्याच कार्यालयातील भिंतीवरच्या घड्याळातल्या छुप्या कॅमेऱ्यातून करण्यात आल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे आणि तो छुपा कॅमेरा तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने बसवला असल्याचेही प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे. हा तेजस मोरे गुन्हेगार आहे आणि प्रवीण चव्हाण यांचा अशील आहे. त्याला इतर गुन्हेगारांनी देखील मदत केली आहे, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे संबंधित व्हिडिओ रेकॉर्डचे संपूर्ण फॉरेन्सिक ऑडिट तयार आहे असे स्पष्ट केल्याने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे.

“गायब” प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर “प्रकट”

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी “पेन ड्राईव्ह बॉम्ब” फोडल्यानंतर त्याच रात्री केवळ एक प्रतिक्रिया देऊन “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज चार दिवसांनंतर हे एबीपी माझा समोर “प्रकट” झाले आणि त्यांनी संबंधित स्टिंग ऑपरेशन एका आरोपीने केल्याचा तसेच त्या स्टिंग ऑपरेशन मधले रेकॉर्डिंग मॅनिप्युलेटेड असल्याचा दावा केला आहे.

प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी 8 मार्च रोजी केला होता. आता त्यावर आज शनिवारी 12 मार्च रोजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझा समोर एक्स्लूझिव्हली त्यांची बाजू मांडली आहे.

गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले. प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. संबंधित “बॉम्ब” फोडून देवेंद्र फडणवीस आहे गोव्याला निघून गेले होते. परवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यात भाजपने प्रचंड विजय मिळवला त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. काल अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे बजेट मांडले.

त्यानंतर “अचानक” राजकीय हालचाली वाढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वर्षा निवासस्थानी “अत्यंत महत्त्वाची” बैठक झाली. महाविकास आघाडीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घ्यायला पोचले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली काल रात्रीच्या या “महत्त्वाच्या वेगवान” घडामोडीनंतर आज सकाळी प्रवीण चव्हाण हे “प्रकट” झाले आणि त्यांनी आपली बाजू एबीपी माझा समोर मांडली आहे.

– स्टिंग ऑपरेशनमध्ये जळगाव कनेक्शन; प्रवीण चव्हाणांचा दावा

देवेंद्र फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला होता. त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होते आहे, असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

– भिंतीवरच्या घड्याळातील छुप्या कॅमेरातून शूट

गिरीश महाजन प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होते आहे. माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आले आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला होता, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

– प्रकरणाच्या चौकशीची मागणी

तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी आपल्याकडे येत होता. तेजस मोरे हा मूळचा जळगावचा आहे आणि जळगावमधूनच हे सर्व करण्यात आले आहे. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांचीही त्याला साथ आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

Fadanavis pendrive Bomb pravin chavan forensic audit

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात