हुतात्मा राजगुरूंच्या वाड्याचा काही भाग कोसळला; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील सरकार, पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष!!


प्रतिनिधी

पुणे : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरु वाड्याच्या प्रवेशद्वाराचा काही भाग सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सरकार रूपक विविध उपक्रम घेत असताना राजगुरेंच्या वाड्याकडे मात्र सरकारचे आणि पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. Part of Hutatma Rajguru’s palace collapsed

हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थान असलेला हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून 18 वर्षांपूर्वी घोषित झाला आहे. आराखड्याप्रमाणे आजूबाजूच्या जागा संपादन करण्यासाठी 15 कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होणे आवश्यक आहे. मूळ वाड्याच्या वेगवेगळ्या भागांची मालकी वेगवेगळ्या लोकांकडे आहे. त्यातील एकाने त्याच्या मालकीची हेरिटेज असलेली इमारत पाडली. त्यामुळे वाड्याचे प्रवेशद्वार खिळखिळे झाले.

तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद

तरीही कार्यवाही नाही 

वाड्याच्या डाव्या बाजूची ही दुमजली इमारत पाडल्यावर, शासनाने काहीही कारवाई केली नाही. ही इमारत जरी खासगी मालकीची असली तरी हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित असल्याने, ती स्मारकाच्या नियंत्रित क्षेत्रात येत आहे. त्यामुळे विभागाने जिल्हाधिका-यांना यासंदर्भात कार्यवाही करावी, असे पत्र दिले होते. तरीही कार्यवाही झाली नाही.

स्मारकाची उपेक्षा सुरुच

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही हुतात्मा स्मारकाची उपेक्षा सुरुच आहे. या जन्मस्थळाला अनेक स्वातंत्र्यप्रेमी आणि हुतात्माप्रेमी भेट देत असतात. मात्र, आता प्रवेशद्वार कोसळल्याने, तेथे जाणे धोकादायक झाले आहे. उर्वरित भिंतही पावसाळ्यात कोसळण्याची भीती असल्याने, त्वरित दुरुस्ती आवश्यक आहे, असे मत क्रांतिवीर राजगुरु ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे, हुतात्मा राजगुरु समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख व सचिव सुशील मांजरे यांनी व्यक्त केले.

Part of Hutatma Rajguru’s palace collapsed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात