परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका ; राज्य सरकारला दणका


विशेष प्रतिनिधी

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत सहआरोपी असलेल्या दोघा अधिकाऱ्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच दणका बसला आहे. Parambir Singh ransom case: Two released on bail

परमबीर सिंग यांच्यासह तत्कालीन ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणोरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर अशा पाच जणांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार कोटी 68 लाखांच्या खंडणी प्रकरणी 24 जुलै 2021 रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईतही सिंग यांच्यासह आठ जणांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. असाच गुन्हा ठाण्यातील ठाणोनगर पोलीस ठाण्यातही सिंग यांच्यासह 29 जणांविरुद्ध दाखल आहे. जैन आणि पुनामिया यांना सुरुवातीला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ कोपरी पोलिसांनीही अटक केली. याच दोघांच्या जामीनावर युक्तिवाद करतांना ऍड. शैलेश सडेकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, मुंबई ठाण्यात तीन ठिकाणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल आहे.ते यात मुख्य आरोपी आहेत. मरीन ड्राईव्हमध्ये 21 जुलै रोजी शामसुंदर अग्रवाल यांनी तर त्यांचे पुतणो शरद अग्रवाल यांनी 23 जुलै रोजी कोपरीमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुळात, ज्या मालमत्ता जैन आणि पुनामिया यांनी घेतल्याचा आरोप आहे, त्याबाबाबत दिवाणी न्यायालयात दावे दाखल होते. न्यायालयाच्याच आदेशाने 2017 मध्ये मीरा भाईंदरमधील ती मालमत्ता संजय पुनामिया आणि जैन यांच्या नावे झाली आहे. मग, ती खंडणी कशी होऊ शकते? शिवाय, मुख्य आरोपी परमबीर सिंग हे कुठे आहेत? त्यांच्या शोधासाठी काय प्रयत्न झाले? याचे पोलिसांकडे उत्तर नाही.

तर दुसरीकडे जैन आणि पुनामिया हे 50 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळेच त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद . सडेकर यांनी केला. त्यावर न्यायालयाने पुनामिया आणि जैन यांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या, परदेशात न जाण्याच्या अटीवर एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
सिंग यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सिंग यांच्याबद्दलची काहीच माहिती पोलिसांना नाही. पण, सह आरोपी 50 दिवसांपासून कारागृहात आहेत. त्यामुळेच त्यांची जामीनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतर काही अटी शर्थीवर ठाण्याचे सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी सुनिल जैन आणि संजय पुनामिया या आरोपींची बुधवारी जामीनावर सुटका केली.

Parambir Singh ransom case: Two released on bail

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर