परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता.Parambir Singh helped the terrorists; Serious allegations by retired ACP Shamsher Pathan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : परमबीर सिंह यांना कोर्टानं फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा हा आरोप आहे. यासंदर्भातलं एक पत्रच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पाठवलं आहे.
शमशेर पठाण या पत्रात म्हणाले आहे की, परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, तर तो मोबाईल लपवण्यात आला होता,असा दावा पठाण यांनी पत्रात केला आहे.
पुढे पठाण म्हणाले की , गिरगाव चौपाटीच्या सिग्नलवर कसाबला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर परमबीर सिंगही तिथे आले होते. त्यावेळी त्यांनी कसाबचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी तो तपास अधिकारी असलेल्या रमेश महाले यांना देणं अपेक्षित होतं.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App