विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग स्वतःच सामोर आले आहेत. परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याचे त्यांनी इंडिया टुडेला सांगितले आहे .परमबीर सिंग यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत त्यावर देखील ते स्पष्टीकरण देणार आहेत.BREAKING NEWS: ‘I am in Chandigarh; Will be appearing in Mumbai for interrogation soon ‘! Parambir Singh’s information to India Today
लवकरच चौकशीसाठी मुंबईला येणार असल्याचं स्वत: परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परमबीर सिंह कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात येत होता. याला आता स्वत: परमबीर सिंह यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आल होत .
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांनी एक पत्र मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर चर्चिलं गेलं. एप्रिल महिन्यात बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर अनिल देशमुख यांना त्यांचं पद सोडावं लागलं. आता अनिल देशमुख तुरुंगात आहेत.
आता परमबीर सिंह यांच्यावतीने वरिष्ठ विधिज्ज्ञ अभिनव चंद्रचूड आणि आसिफ लंपवाला हे आयोगासमोर हजर झाले. पावर ऑफ अटर्नीसोबत (परमबीर सिंह यांचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्ती) देण्यात आलेलं प्रतिज्ञापत्र त्यांनी आयोगासमोर सादर केलं.
पावर ऑफ अॅटर्नी चंदीगढमध्ये तयार करण्यात आलेली असून, महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला आयोगासमोर परमबीर सिंह यांचा प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परमबीर सिंह यांचा आयोगासमोर काही सांगण्याचा उद्देश नाही, असंही आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.
‘परमबीर सिंह यांना जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जे सांगितलं गेलं, ते खूप आहे’, असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App