गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचा सेवा सप्ताह संकल्प; ऊसतोड कामगारांच्या फडावर जाऊन साजरी केली जयंती

Pankaja Munde Visits Sugarcane Workers Families On Gopinath Munde Birth Anniversary

Pankaja Munde : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सेवा संकल्प केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करून या सप्ताहाची सुरुवात केली. गोपीनाथ मुंडे यांचं समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावरून विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. Pankaja Munde Visits Sugarcane Workers Families On Gopinath Munde Birth Anniversary


प्रतिनिधी

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सेवा संकल्प केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करून या सप्ताहाची सुरुवात केली. गोपीनाथ मुंडे यांचं समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावरून विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

वैद्यनाथ साखर कारखान्याचा गाळप हंगामाची सुरुवात करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या, आजच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच मुंडे समर्थकांनी गर्दी केली होती. फुलांच्या आरासीने समाधी स्थळ सजविण्यात आले. गत दोन वर्षे सलग कोविड मुळे कार्यक्रम रद्द झाले होते. परंतु यंदा काही अंशी सूट दिल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली. गोवर्धन हिवरा या शिवारात जाऊन पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली. यावेळी ऊसतोड कामगारांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्या बरोबर जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच

याच संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, “लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त ‘संकल्प सेवेचा’, ‘सेवा यज्ञ’ उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. तसेच ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवारांचे कोविड लसीकरण करून घेतले.”

Pankaja Munde Visits Sugarcane Workers Families On Gopinath Munde Birth Anniversary

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात