सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले : मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये, आम्ही सर्वात जास्त कंडोम वापरतो

वृत्तसंस्था

हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या धर्म-आधारित लोकसंख्येच्या असंतुलनावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले की, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये, सर्वाधिक कंडोम मुस्लिम वापरतात आणि मोहन भागवत यांनी आकडे समोर ठेवून बोलले पाहिजे.Owaisi said Muslim population is not increasing, we use condoms the most

काय म्हणाले होते सरसंघचालक?

खरे तर, सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हटले होते की, देशाला सर्वसमावेशक लोकसंख्या धोरणाची गरज आहे. धर्म आधारित लोकसंख्येच्या असंतुलनाचा फटका देशाला बसला आहे. 1947 ची फाळणी आणि पाकिस्तानच्या उदयाला कथित धर्म-आधारित लोकसंख्येचे असमतोल कारणीभूत ठरले.



ओवैसी काय म्हणाले?

सरसंघचालकांच्या वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “मोहन भागवत म्हणतात की भारतात धार्मिक असमतोल आहे आणि लोकसंख्येचा विचार केला पाहिजे. एकूण प्रजनन दर (टीएफआर) दोन टक्के आहे. देशातील सर्वाधिक टीएफआर मुस्लिमांसाठी घसरला आहे. मला भागवतांना विचारायचे आहे की 2000 पासून 2019 पर्यंत 90 लाख हिंदू भगिनींची मुले बेपत्ता आहेत, इंग्रजीत याला फीमेल फेटिसाइड (स्त्री भ्रूणहत्या) म्हणतात. यावर भागवत का बोलत नाहीत?

ओवेसी म्हणाले की, कुराणमध्ये मुलींची हत्या हा सर्वात मोठा गुन्हा असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. मुस्लिम 1000 मुले जन्माला घालत असतील, तर 943 मुली जन्माला घालत आहेत. हिंदू बांधव 1000 मुले जन्माला घालत असतील, तर 913 मुलींना जन्म देत आहेत. भागवत या आकडेवारीबद्दल का बोलत नाहीत? ओवेसी म्हणाले, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये. अहो लोकसंख्या वाढत आहे ह्याच्या टेन्शन मध्ये येऊ नका. आपली लोकसंख्या कमी होत आहे.

मुस्लिमांच्या लोकसंख्या नियंत्रणावर ओवेसी म्हणाले…

भागवतांवर निशाणा साधत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा टीएफआर घसरत आहे. टेन्शन नका घेऊ. एका अपत्यानंतर दुसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोण देत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मुस्लिम आहेत. कंडोम सर्वात जास्त कोण वापरत आहे? आम्ही वापरत आहोत. मोहन भागवत यावर बोलणार नाहीत. मी तथ्य सांगत आहे. लोकसंख्या कुठे वाढतेय भागवत साहेब. तुम्ही डेटा ठेवून बोलत नाहीत.”

Owaisi said Muslim population is not increasing, we use condoms the most

महत्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात