किसान महासभा सचिवाची दहशतवादी भाषा, नागपूरमधील रेशीमबाग उडवून देण्यासह सरसंघचालकांना मारण्याची धमकी

शेतकरी आंदोलन भडकाविण्यासाठी किसान महासभेच्या सचिवांनी आता दहशतवादाची भाषा बोलायला सुरूवात केली आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेली रेशीमबाग उडवून दिली जाईल. त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांना ठार मारण्याचीही धमकी महाराष्ट्र राज्य किसान महासभेचे सचिव अरुण बंकर यांनी दिली आहे. Terrorist language of Kisan Mahasabha secretary, threat to kill Sarsanghchalak Mohan Bhagwat including blowing up Reshim Baug in Nagpur


विशेष प्रतिनिधी

नागपूर : शेतकरी आंदोलनाला भडकाविण्यासाठी किसान महासभेच्या सचिवांनी आता दहशतवादाची भाषा बोलायला सुरूवात केली आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेली रेशीमबाग उडवून दिली जाईल. त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांना ठार मारण्याचीही धमकी महाराष्ट्र राज्य किसान महासभेचे सचिव अरुण बंकर यांनी दिली आहे.अरुण बंकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदी यांच्या समोर एकच रस्ता आहे. त्यांनी नवे कृषि कायदे मागे घ्यावेत अन्यथा त्यांना आत्महत्या करावी लागेल. सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला तर भारतीय सेनेचे जवान विद्रोह करतील. मी नागपूरला राहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथेच आहे. मोहन भागवतही येथेच असतात. आम्ही विद्यार्थीदशेपासून क्रांतीकारी आहोत. जर मोदींनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तर आम्ही मोहन भागवत यांना ठार मारू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देऊ.

Terrorist language of Kisan Mahasabha secretary, threat to kill Sarsanghchalak Mohan Bhagwat including blowing up Reshim Baug in Nagpur

शहीद किसान स्तंभ येथे बोलताना अरुण बंकर म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी मोदींना धडा शिकविण्यासाठी दिल्लीला जात आहेत. मोदींनी जर शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही तर कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. अरुण बंकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबला शुक्ला यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. बंकर यांनी जाहीरपणे धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*