राहूलच नव्हे तर सोनिया गांधी यांचाही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास विरोध, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट


विशेष प्रतिनिधी

बीड : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होऊ नये अशी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांची इच्छा होती असे म्हटले जाते. त्यामुळेच कॉँग्रेसला निर्णय घेण्यास वेळ लागला. पण राहूलच नव्हे तर कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास विरोध होता असा गौप्यस्फोट कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.Opposition to not only Rahul but also Sonia Gandhi to join Mahavikas Aghadi, Nana Patole’s statement

बीड येथे बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार नव्हते; पण केवळ भाजपला सत्ता मिळू नये म्हणून आम्ही महाविकास अघाडीमध्ये सहभागी झालो. त्यामुळेच काँग्रेसने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद घेतले नाही. काँग्रेसची केवळ एकच इच्छा होती की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे.



नाना पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा दिसून आले आहे. काँग्रेसच्या मंत्री, आमदारांना राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात गृहित धरले जात नाही, अशी तक्रार कॉँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कॉँग्रेसला गृहित धरू नये, असा इशारा पटोले यांनी दिल्याचे मानले जात आहे.

Opposition to not only Rahul but also Sonia Gandhi to join Mahavikas Aghadi, Nana Patole’s statement

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात