Opposition leader Praveen Darekar : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Opposition leader Praveen Darekar charged in Pune; offensive statement about women On Surekha Punekar joining NCP
विशेष प्रतिनिधी
पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर येथे १३ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या क्लिप सोशल मीडिया व टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाले आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १४ सप्टेंबर रोजी प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे विधान केलेले होते.
त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली आहे. दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाचे मनामध्ये लज्जा उत्पन्न होऊन महिलांच्या वियनशिलतेचा अपमान केलेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे अर्ज दिला होता. मंगळवारी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी प्रवभ्ण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Opposition leader Praveen Darekar charged in Pune; offensive statement about women On Surekha Punekar joining NCP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App