कॉँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच, मंत्रीमंडळात किंमत नसल्याची अप्रत्यक्ष तक्रार


कॉँग्रेसच्या राज्यस्तरावरील बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मिळत असलेल्या दुजाभावाचीच चर्चा झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राज्याच्या मंत्रीमंडळात आपल्याला किंमत नसल्याची अप्रत्यक्ष कबुली मंत्र्यांनी दिली आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला दुजोरा दिला.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : कॉँग्रेसच्या राज्यस्तरावरील बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मिळत असलेल्या दुजाभावाचीच चर्चा झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतOnly Shiv Sena and NCP in the Congress meeting, indirect complaint that there is no price in the cabinet

राज्याच्या मंत्रीमंडळात आपल्याला किंमत नसल्याची अप्रत्यक्ष कबुली मंत्र्यांनी दिली आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला दुजोरा दिला.काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुतील एमसीए क्लबमध्ये शुक्रवारी काँग्रेस मंत्र्यांची बैठक झाली.बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्र्यांनी तक्रार केली की निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडील खात्यांना झुकते माप दिले जाते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपले अनुभव सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला अधिकचा निधी दिला जातो. मात्र, कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी मागणी करूनही निधी मिळत नाही.

कॉँग्रेसच्या काही नेत्यांच्या विनाकारण वाचाळपणावरही यावेळी चर्चा झाली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वादात कॉँग्रेसनेच देशमुख यांची बाजू घेतली. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे आघाडी सरकार आणि काहीही कारण नसताना काँग्रेसही बदनाम झाल्याचा मुद्दा काही मंत्र्यांनी मांडला.

अनिल देशमुख यांची बाजू सावरण्यासाठी काँग्रेस नेते आघाडीवर राहिले, राष्ट्रवादीचे नेते फारसे पुढे आले नाहीत, आघाडी म्हणून एकजूट दिसली नाही, असेही मंत्र्यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत विनाकारण नाक खुपसत असल्याची टीकाही बैठकीत करण्यात आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे यूपीएच्या अध्यक्षांबद्दल वारंवार विधाने करतात,

त्याबद्दल बहुतांश मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तर, पुन्हा पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी हा विषय एकदा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्याचा सूचना पुढे आली. त्याला सर्वच मंत्र्यांनी पाठिंबा दिला.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील तीन पक्षांमध्ये समन्वय नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करावेत, परंतु राज्याला पुन्हा आर्थिक संकटात लोटणाऱ्या आणि सर्वसामान्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागणारी टाळेबंदी टाळावी, असे सांगण्यात आले.

Only Shiv Sena and NCP in the Congress meeting, indirect complaint that there is no price in the cabinet

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती