नुकसान दाखवायचे तर अधिकारी 500 रुपये मागतात; साहेब आमची दिवाळी गोड करा!!; मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हाक


प्रतिनिधी

लातूर : “साहेब काही करा, पण आमची दिवाळी गोड करा!!, साधे नुकसान दाखवायचे म्हणले तर सरकारी अधिकारी पाचशे रुपये मागतात,” अशा तीव्र भावना मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे व्यक्त केल्या.Officials demand Rs 500 to show damages; Sir make our Diwali sweet !!; The call of farmers in Marathwada

फडणवीस सध्या अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून, “साहेब काहीही करा पण आमची दिवाळी गोड करा,” अशी विनवणी केली. या दौर्‍यातले अनुभव फडणवीस यांनी ट्विटर वर शेअर केले.साहेब ! काहीही करा, पण आमची दिवाळी गोड करा हे आर्त स्वर काळीज चिरणारे आहेत, मनाला सुन्न करणारे आहेत ! शेतकरी जेव्हा सांगतात की, नुकसान दाखवायचे असेल तर ५०० रुपये द्या, अशी मागणी होते, तेव्हा संताप अनावर होतो. सरकारने मदत तर द्यावीच, पण ही वसुली आधी थांबवावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद गावात तसेच गौर मसलगा गावात वावरंच्या वावरं पाण्याखाली आहेत. नुकसानीची तीव्रता आणि शेतकऱ्यांचे दुःख हे वर्णनापलिकडे आहेत. मदत थेट शेतकऱ्यांच्या खातात जमा झालीच पाहिजे.

जोवर शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, तोवर आम्ही ठाकरे – पवार सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्या प्रत्येक संघर्षात आम्ही सोबत राहू , असे आश्वासन फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले.

Officials demand Rs 500 to show damages; Sir make our Diwali sweet !!; The call of farmers in Marathwada

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण