आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं.ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटते, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी केले आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संताप व्यक्त होत असून भाजपाने राजीनाम्याची मागणी केली आहे.OBCs were not ready to fight when they wanted to fight for reservation, Jitendra Awahan

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमासाठी आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे. ते म्हणाले, ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही.



कारण मंडल आयोगाच आरक्षण हे ओबीसींसाठी होते. परंतु जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते,तेव्हा लढायला हव होतं. आता आरक्षणाच्या निमित्ताने सगळे पुढे येत आहेत. पण नुसते पुढे येऊन घरात बसून व्हाटसअप करून चालणार नाही. तर त्यासाठी रस्त्यावर यावे लागेल.

ओबीसींना भडकावताना आव्हाड म्हणाले, त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील.

आव्हाड यांनी इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ओबीसी समाजाचा अपमान करणारे आव्हाड यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल भाजपाने केला आहे. ओबीसी समाजावर राष्ट्रवादी कॉँग्रेसला ऐवढा राग का? यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवलं का? असेही भाजपाने म्हटले आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे नेहमीच धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिणवलं गेलं, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. आव्हाडांनी असं वक्तव्य केल्यानं त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे.

या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावं लागेल. त्यांच्यासारख्या कल्पित लोकांमुळेच आरक्षण केलं. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही.राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात.

शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

OBCs were not ready to fight when they wanted to fight for reservation, Jitendra Awahan

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात