आता लक्ष महाराष्ट्र सरकार, सगळ्यांना पुरुन उरलो : नारायण राणे यांनी फोडली सिंधुदुर्गातून डरकाळी


वृत्तसंस्था

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला असून आता पुढचं टार्गेट हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्रातील सत्ता भाजपचीच असेल, अशी डरकाळी त्यांनी फोडली आहे. Now the attention on to form government of bjp in Maharashtra: Narayan Rane

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे अर्थात भाजपने महाविकास आघाडीला चारिमुंडया चित केले आहे. महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल आणि भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली.त्यात राणे समर्थक पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि राज्यात भाजपची सत्ता असेल, असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखिळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती. त्या वक्तव्याचा समाचार राणे यांनी घेतला आहे.ते म्हणाले, ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.

३९ उमेदवार रिंगणात

जिल्हा बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान झाले होते. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी माध्यमिक शिक्षक पतपेढीत पार पडली. ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली गेली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा जिंकल्या आहेत.

Now the attention on to form government of bjp in Maharashtra: Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण