आता अजित पवारही अ‍ॅडमॅन, त्यांच्या इमेज मेकींगसाठी राज्यावर सहा कोटी रुपयांचा भार


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:च्या इमेज मेकींगसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. त्याचा आदर्श घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या इमेज मेकींगची तयारी केली आहे. मात्र, त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. Now Ajit Pawar is also an Ad Man, a burden of Rs 6 crore on the state for making his image


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:च्या इमेज मेकींगसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. त्याचा आदर्श घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या इमेज मेकींगची तयारी केली आहे. मात्र, त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.

अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचावेत याची जबाबदारीही या एजन्सीवर असणार आहे. आदेशात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ही एजन्सी अजित पवारांचे ट्विटर हॅण्डल, फेसबुक, ब्लॉगर, युट्यूब, इन्स्टाग्राम अकाऊंट्स हाताळणार आहे. याशिवाय साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल आणि एसएमएस या जबाबदाºयाही त्यांच्याकडे असतील.

राजकीय नेत्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात गैर नाही. मात्र, त्याचा खर्च जनतेच्या कररुपी पैशातून का? असा सवालही या निमित्ताने होत आहे. अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार सहा कोटी खर्च करणार असून बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.



भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ रद्द करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा पीआर झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? करोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात. यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता. जनता, डॉक्टर, नर्सेस पैसे आणि पगाराविना तडफडत आहेत. लोक करोनामुळे मरत असतानादेखील या निर्लज्ज आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ ररद्द करा आणि याची पूर्ण चौकशी करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Now Ajit Pawar is also an Ad Man, a burden of Rs 6 crore on the state for making his image

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात