विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद :औरंगाबादमध्ये वडिलांकडून मुलाला घोडा भेट देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे गाड्या वापरणे आता परवडत नसल्याने घोड वापरण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले.Not being able to afford Petrol; Horse gift from father to son in Aurangabad
गाडी घरी उभी करून त्या मुलाची शहरभर घोडेसवारी सुरु आहे. हा एक कुतूहलाचा विषय बनला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे राज्य सरकार इंधनावरील कर कपात करत नसल्याने ही वेळ आता जनतेवर आली आहे.
महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात इंधनाच्या करात कपात केली आहे. राज्यात मात्र सरकारने दारूवरच्या करात मोठी कपात केली. मात्र इंधन करात कपात केली नाही. त्यामुळे आता वाहनांसाठी लोकांना घोड्याचा वापर करावा लागत आहे.
राज्यात जनतेने घोड्यावरून प्रवास करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने राज्यात जणू शिवशाहीच आली की काय ? , असा प्रश्न पडू लागला आहे. काही दिवसांत लोक बैलगाडीतून प्रवास करतील, यात शंका नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा दमनीतून प्रवास केला होता. यातून भविष्य फारच खडतर दिसत आहे, हे वरील उदाहरणांमुळे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App