विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आग्रा महा मार्गावर शेतकरी वीजप्रश्नी आणि पीक नुकसान भरपाई आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले.BJP’s sit-in agitation on Mumbai-Agra highway; Aggressive role on various issues of farmers
आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली दोन तास मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
सक्तीने विज बिल वसुली, लाईट कट करणे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही व सरकार केवळ वसुलीत मग्न असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी आज मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड पेट्रोल चौफुली येथे आंदोलन करण्यात आले.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १५ दिवसांकरीता माघार घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App