Chandigarh MNC Election Results : चंदिगड महापालिकेत ‘आप’ची बल्ले बल्ले, पहिल्यांदाच १४ वॉर्ड जिंकले, भाजपला १२ जागा, काँग्रेसकडे ८, तर अकाली दलाकडे १ जागा

Chandigarh MNC Election Results For the first time AAP won 14 wards, BJP won 12 seats, Congress won 8 seats and Akali Dal won one seat

Chandigarh MNC Election Results : पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी चंदिगड महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सर्वाधिक वॉर्ड जिंकून राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. चंदिगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. Chandigarh MNC Election Results For the first time AAP won 14 wards, BJP won 12 seats, Congress won 8 seats and Akali Dal won one seat


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी चंदिगड महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सर्वाधिक वॉर्ड जिंकून राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. चंदिगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षाने 14 प्रभागांमध्ये विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर भाजपने 12 प्रभाग काबीज केले आहेत. याशिवाय काँग्रेसने 8 प्रभाग, तर शिरोमणी अकाली दलाने एका प्रभागात विजय मिळवला आहे.

भाजपचे महापौर पराभूत

चंदिगड महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महापौर रवी शर्मा त्यांच्या प्रभागातून पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार आणि विद्यमान महापौर रवी शर्मा यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार दमनप्रीत सिंग ऊर्फ ​​बादल यांनी पराभव केला आहे. त्यांना 828 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

राघव चढ्ढा निवडणूक निकालावर काय म्हणाले?

चंदिगड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील आप नेते राघव चढ्ढा म्हणाले की, हा फक्त ट्रेलर आहे. ते म्हणाले, “मी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या वतीने चंदिगडच्या जनतेचे आभार मानतो की, आमच्यासारख्या छोट्या आणि प्रामाणिक पक्षाला इतकं प्रेम आणि विश्वास दिल्याबद्दल, ज्यांनी इथे पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. चंदिगड फक्त ट्रेलर आहे, पंजाबचा पिक्चर बाकी आहे.”

चंदिगड महापालिकेत 35 जागा

उल्लेखनीय बाब म्हणजे चंदिगड महापालिकेत 35 जागा आहेत. आतापर्यंत चंदिगड महापालिका भाजपच्या ताब्यात होती. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाने सर्वाधिक वॉर्ड जिंकले आहेत. चंदिगड महापालिका निवडणुकीत 15 वर्षांनंतर एखाद्या पक्षाने पहिल्यांदाच भाजपचा पराभव केला आहे.

Chandigarh MNC Election Results For the first time AAP won 14 wards, BJP won 12 seats, Congress won 8 seats and Akali Dal won one seat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात