ना शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री आलेत; ना नुकसानीचे पंचनामे झालेत; ठाकरे – पवार सरकारवर फडणवीस बरसले


विशेष प्रतिनिधी

वाशिम : विदर्भ, मराठवाडा, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूर येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण ठाकरे – पवार सरकारने नुसतेच पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पण ना शेतकऱ्याच्या बांधावर मंत्री आले आहेत, ना पंचनामे सुरू झाले आहेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला घेरले आहे. No ministers have come to the farmers’ dam; There have been no damages; Thackeray – Fadnavis rained down on Pawar government

वाशिम जिल्ह्यातील शिवणी रोड तसेच पिंप्री येथे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची फडणवीस यांनी आज पाहणी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राजेंद्र पाटणी आणि इतर सहकारी सोबत होते.1ऑक्टोबरला वाशिम जिल्हात रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने शेतातल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला. 15 दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे.10 दिवसांपूर्वीच सोयाबीन काढायला येऊन या पावसामुळे शेतकऱ्यांना आपली पिके सोंगणे कठीण केले. 30 सप्टेंबर अखेर तरी हा पाऊस थांबेल व खराब झालेले सोयाबीन जमा करून घ्यावे या आशेवर शेतकरी होता मात्र तसे न होता अजूनही पावसाची संततधार चालूच आहे. सोयाबीन, कापूस, उडीद पिके खराब झाली असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढायला ना सरकारने पंचनामे सुरू केलेत. ना सत्तेतले मंत्री, आमदार शेताच्या बांधावर फिरकायला तयार आहेत, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांना कुणाचा आधार नसल्याचे वाटत आहे. शेतकऱ्यांच्या हातचे तोंडी आलेला घास या निसर्गाच्या पावसाने गमावला. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ठाकरे – पवार सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा “विमा योजनेचा”लाभ पदरी पडावा या साठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

No ministers have come to the farmers’ dam; There have been no damages; Thackeray – Fadnavis rained down on Pawar government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण