नीरज चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.यादरम्यान त्याने पाण्याखाली भाला फेकण्याचा सराव केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. गोल्डन बॉय नीरज जगातील सर्वात सुंदर ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे पण तो नेहमी त्याच्या खेळाबद्दल आणि भाल्याबद्दलच विचार करत असतो.त्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. GOKDEN TWIST: Sky-lander-underwater ‘Niraj’ Always Javelin Thrower
तो त्याच्या खेळाबद्दल किती गंभीर आहे यासाठी त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 23 वर्षीय देशाचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा मालदीवमधील फुर्वेरी रिसॉर्टमध्ये आहे . येथे स्कुबा डायव्हिंग दरम्यान त्याने पाण्याखाली भाला फेकण्याची अॅक्टींग केली. ज्याचा व्हिडिओ त्याने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नीरजने लिहिले, “आकाशात, जमिनीवर किंवा पाण्याखाली, मी नेहमी भाला फेकण्याचा विचार करतो. त्याने पुढे लिहिले की प्रशिक्षण सुरू झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App