विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. No matter who the boy is, the law is the same for everyone, Ajit Pawar’s reaction to Aryan Khan’s arrest
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( एनसीबी) एका क्रुझवर छापा मारत शाहरुख खानच्या मुलासह दहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह तिघा जणांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. उर्वरित 5 जणांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आर्यन खानवर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार की नाही ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सध्या क्रुज रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली, याबाबत विचारणा केली असता मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे ते म्हणाले. मोठ्यांची मुले असू देत किंवा कुणाचीही असू देत. प्रत्येकाला कायदा, नियम सारखेच ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत.
काल रात्री एनसीबीने एका क्रुझवर छापा मारत आर्यन खान याच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तसेच, या प्रकरणात एनसीबीला आर्यन खानकडे अमली पदार्थ सापडले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
एनसीबीने आज सायंकाळी आर्यनसह आठ जणांना अटक केली.तिघांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली. मात्र, कोटार्ने तिघांचीही उद्यापर्यंत एनसीबीला कोठडी दिली आहे. यामुळे आर्यन खानसह तिघांना आजची रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे. तसेच अन्य ५ आरोपींना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App