प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली नाहीत, कंड्या पिकवू नका,पतंग उडवू नका, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. कृपया कंड्या पिकवू नका असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.No discussion of changing State Bjp president, Devendra Fadnavis clarity

फडणवीस म्हणाले, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अतिशय उत्तम काम करत आहेत, आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी आहोत, हायकमांड ही त्यांच्या पाठीशी आहे, केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत, त्यांच्या भेटीगाठी घ्यायला दादा व अन्य पदाधिकारी दिल्लीला गेलेत.त्यामुळे कृपया कंड्या पिकवू नकाजोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही भाजपाची भूमिका असल्याचा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.फडणवीस म्हणाले. मातंग समाज, बुरुड समाज, चर्मकार समाज, वाल्मिक-सुदर्शन समाज यांच्यापर्यंत आरक्षण पोचलेले नाही. त्यांच्या पर्यंत आरक्षण पोचण्याकरिता वर्गवारी करणे आवश्यक आहे. आरक्षण देऊनही अनेक समाज मागे राहिले आहेत. दीर्घकालीन आरक्षण सुरु ठेवण्यासोबतच जे समाज घटक आरक्षणामधून सुटले आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजे याकरिता यंत्रणा उभारावी लागेल.

No discussion of changing State Bjp president, Devendra Fadnavis clarity

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण