तेजस ठाकरे हे शिवसेनेचे “विविअन रिचर्डस”; म्हणजे नुसताच तडाखेबंद खेळ; कॅप्टनशिप कधीच नाही का…??


नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे नातू तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकारणात धमाकेदार एंट्री करण्याच्या बेतात आहेत. त्यांची ही एंट्री वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज विवियन रिचर्ड्स याच्यासारखी असेल, अशी जाहिरात शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांनी सामनाच्या पहिल्या पानावर छापून आणली आहे.Tejas Thackeray Shiv Sena’s Vivian Richard… means always no. 2 after Aditya Thackeray

त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रत तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तेजस ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने शिवसेनेत दुसरे, नव्हे तर तिसरे स्थान देण्यात येईल, असेच सूचक संकेत “शिवसेनेचे विवियन रिचर्ड्स” या जाहिरातीतून देण्यात येत आहेत.मध्यंतरी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांची युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड होण्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. या बातम्यांना अधिक हवा मिळून चर्चेचे नवनवे फाटे
फुटण्‍यापूर्वीच शिवसेनेतल्या युवासेनेचे प्रमुखपद हे ठाकरे घराण्यातच रहावे, अशी व्यूहरचना करण्यात येत असल्याचे समजते.

त्यातूनच तेजस ठाकरे यांची राजकीय प्रतिमा विकसित करण्याचे घाटत आहे. “माझा आक्रमकपणा तुम्हाला तेजसमध्ये दिसेल”, असे बाळासाहेब ठाकरे यांनी एका जाहीर सभेत म्हटले होते. बाळासाहेबांच्या या वक्तव्याचाही चपखल वापर तेजस यांच्या राजकीय प्रतिमेसाठी करून घेता येत आहे. म्हणूनच “तेजस ठाकरे हे शिवसेनेचे विविअन रिचर्डस आहेत”, अशी ओळख शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्रात ठसविण्याचा या जाहिरातीतून प्रयत्न करण्यात आला आहे.

अत्यंत आक्रमक खेळी आणि विरोधकांना मैदानात गारद करण्याची विलक्षण क्षमता हे विविअन रिचर्डस यांचे वैशिष्ट्य होते. पण ते वेस्टइंडीज टीमचे कॅप्टन कधीच बनले नाहीत. बनले असले तरी फार थोडा काळ. ते कायम अन्य कर्णधारांच्या नेतृत्वाखाली उत्तम खेळी करत राहिले.

मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या या जाहिरातीतून तेजस ठाकरे यांची राजकीय भूमिका विविअन रिचर्डस यांच्यासारखी तडाखेबंद खेळी करण्याची राहील. परंतु ते शिवसेनेचे कॅप्टन होणार नाहीत. कॅप्टनशिप आदित्य ठाकरे यांच्याकडेच राहील, असेही सूचक राजकीय विधान या जाहिरातीतून करण्यात आल्याचे दिसते.

बाकी मुंबई महापालिकेमध्ये तेजस ठाकरे कसा चमत्कार घडवतील?, त्यांचे निसर्गप्रेम कसे आहे? निसर्गातले विविध प्राणी, पक्षी त्यांनी कसे शोधून काढलेत, या विषयीची चर्चा मराठी माध्यमे भरपूर घडवत आहेत. विविध माध्यमांमध्ये स्पॉन्सर्स्ड प्रोग्रॅम यानिमित्ताने सुरूही झाले आहेत. भविष्यकाळात ते अधिक वाढणे वाढतील याविषयी शंका नाही.

परंतु, तेजस ठाकरे यांना विवियन रिचर्ड्स संबोधून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची राजकीय भूमिका आदित्य नंतरची म्हणजे सध्या क्रमांक तीनची आणि नंतर क्रमांक 2 अशीच राहील असे स्पष्टपणे सूचित केल्याचे दिसते.

Tejas Thackeray Shiv Sena’s Vivian Richard… means always no. 2 after Aditya Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण