दहीहंडीचा जल्लोष आज नाहीच, ठाकरे सरकारने दाखविले केंद्र सरकारकडे बोट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : यंदाही दहीहंडी सार्वजनिक साजरी करता येणारच नसून नियमात कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचे गृह विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव सामूहिकरीत्या साजरे केले जाऊ नये अशी सूचना केंद्र सरकारने केली असल्याकडेही राज्य सरकारने लक्ष वेधले आहे. No dahihandi prog. This year too

दहीहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची अधिक भीती असल्याने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जाऊ नये असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. दहीहंडीऐवजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेण्याचे आवाहनही या परिपत्रकात करण्यात आले आहे.दहीहंडी साजरी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर भाजप आणि मनसेकडून दबाव टाकला जात असला तरी महाविकास आघाडीने या दबावाला बळी न पडता कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

गृह विभागाने परिपत्रकामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या २७ ऑगस्टच्या पत्राचा हवाला दिला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी या सणांच्या निमित्ताने लोक एकत्र आल्यास कोरोना संसर्गामध्ये वाढ होणार असल्याची भीती या पत्रात व्यक्त केली आहे. या उत्सवावर सामूहिकरीत्या एकत्र येण्यास कडक निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याची सूचनाही केली आहे.

No dahihandi prog. This year too

महत्त्वाच्या बातम्या