पुण्यात गुरुवारी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही; महापौर मोहोळ यांचे ट्विट


वृत्तसंस्था

पुणे : गेल्या दीड ते दोन वर्षांच्या इतिहासात प्रथमच आज गुरुवारी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.  No corona patient died in Pune on Thursday; Mayor Mohol’s tweet

कोरोनाचा पहिला रुग्ण हा सुमारे दीड वर्षांपूर्वी सिंहगड परिसरात सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत जाऊन मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागला होता. आज गुरुवारी प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण हा मृत्यू पावला नसल्याचे उघड झाले आहे. एकंदरीत हा प्रकार जनतेसाठी दिलासादायक असा आहे. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर असा दिलासा मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. दुसरी लाट ओसरत चालली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण दगावला नाही, हे वृत्त एकूणच पुणेकरांसाठी दिलासादायक असेच आहे.

No corona patient died in Pune on Thursday; Mayor Mohol’s tweet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात