नेहरू – व्ही. पी. सिंग यांच्या फुलपूर मतदारसंघातून नितीश कुमारांचा लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा मनसूबा; राजकीय अर्थ काय??


विशेष प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विरोधकांच्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्यापैकी गंभीर मानता येईल अशी एक राजकीय हालचाल सध्या सुरू आहे, ती म्हणजे उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष उतरवणे!! फुलपूर लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी समाजवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी आपल्याला पाठिंबा देईल, असे जाहीर आश्वासन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांना दिले आहे. नितीश कुमार हे फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे राजकीय संकेत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूचे अध्यक्ष लल्लनसिंग यांनी आधीच दिले आहेत आणि या पार्श्वभूमीवरच नितीश कुमार यांना फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची ऑफर अखिलेश यादव यांनी दिली आहे.Nitish Kumar may contest loksabha election from phulpur constituency of pt. Jawaharlal Nehru and V. P. Singh may put serious challenge to modi government



 नेहरू ते अतिक अहमद

नितीश कुमार यांनी खरंच अखिलेश यादव यांची ऑफर स्वीकारली आणि लल्लनसिंग यांची राजकीय हिंट खरी ठरली, तर देशातले सर्व विरोधक केंद्रातल्या मोदी सरकारला खरंच गांभीर्याने आव्हान देत आहेत, असे वातावरण निर्मिती व्हायला हरकत नाही. कारण फुलपूर हा मतदार संघ असा आहे की जो मूळातच हायप्रोफाईल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघापासून 100 किलोमीटर अंतरावरचा हा मतदारसंघ आहे. इतकेच नाही तर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा पहिला मतदार संघ आहे. 1952 ते 1962 अशा सर्व निवडणुकांमधून नेहरू हे फुलपूरचे खासदार होते. या मतदारसंघाने देशाला दोन पंतप्रधान दिले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह!! विश्वनाथ प्रताप सिंह हे 1971 मध्ये फुलपूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले होते. या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय प्रवास पंडित जवाहरलाल नेहरू ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बाहुबली अतिक अहमद असाही राहिला आहे. अतिक अहमद फुलपूर मतदारसंघातून 2004 आणि 2009 अशा दोन वेळेला लोकसभेत पोहोचला होता.

मोदींची राजकीय कॉपी

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नितीश कुमार यांनी बिहार राज्य सोडून उत्तर प्रदेश यासारख्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या राज्यांमधून निवडणूक लढवणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय कॉपी करण्यासारखे आहे. नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदाचे उमेदवार होताच आपला मतदारसंघ स्वतः निवडून वाराणसी घेतला होता. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघाचे खासदार झाले. नितीश कुमार हे देखील बिहारच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ आहेत. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर बिहारचे मुख्यमंत्री पद बाजूला करून खरंच उत्तर प्रदेशातल्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली, तर ती नरेंद्र मोदींची राजकीय कॉपी ठरू शकते. पण त्याच वेळेला केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी बाकीच्या सर्व नेत्यांपेक्षा नितीश कुमार हे अधिक गंभीर आहेत, हे देखील राजकीय दृष्ट्या एस्टॅब्लिश होऊ शकते!!

नितीश कुमार एरिया सोडून बाहेर पडणार??

कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जरी कितीही राजकीय महत्त्वाकांक्षी असले तरी आपापला राजकीय एरिया सोडून ते नरेंद्र मोदींना आव्हान देणारे नेते ठरलेले नाहीत. नितीश कुमार यांनी बिहार सोडून उत्तर प्रदेशातून आणि तेही फूलपूर सारख्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मतदारसंघातून खरंच निवडणूक लढवली, तर हे नरेंद्र मोदींना गंभीर आव्हान देण्यासारखे ठरू शकते. अर्थात या गंभीर आव्हानाचा परिणाम काय होईल ही बाब नंतर तपासण्याची असणार आहे.

Nitish Kumar may contest loksabha election from phulpur constituency of pt. Jawaharlal Nehru and V. P. Singh may put serious challenge to modi government

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात