नितीन गडकरी यांची मोठी घोषणा ; पुढील महिन्यात खरेदी करणार हायड्रोजन वर चालणारी कार

  • केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस करतानाचा ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायोएलएनजी या सारख्या अन्य पर्यायाना महत्व देत असल्याचे गडकरी म्हणाले. Nitin Gadkari’s big announcement; Will be buying a hydrogen-powered car next month

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोमवारी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी केंद्रीय रस्ते निर्माण आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की ते पुढील महिन्यात हायड्रोजन वर चालणारी कार खरेदी करणार आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस करतानाचा ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायोएलएनजी या सारख्या अन्य पर्यायाना महत्व देत असल्याचे गडकरी म्हणाले.इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली

देशात पारंपारिक इंजिन वाहन नोंदणी बंद होणार नाही परंतु इलेक्ट्रिक वाहन धोरण सरकार वेगाने राबवीत आहे.दरम्यान देशातील ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि त्यासाठी सुद्धा सरकार धोरण ठरवीत आहे.

इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचा खर्च कमी होणार

गडकरी म्हणाले की ई – वाहन विकास केला जात असताना २५० स्टार्टअप या काळात सुरु आहे.तसेच ई – वाहने निर्मितीचा खर्च कमी होणार आहे त्यामुळे ही वाहने सर्वसामान्य लोकांना परवडतील अश्या किमतीत मिळतील.

Nitin Gadkari’s big announcement; Will be buying a hydrogen-powered car next month

महत्त्वाच्या बातम्या