नितीन गडकरी म्हणाले, मंत्र्यांना अडचणीत आणतात बायको किंवा मेहुणा, पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम


विशेष प्रतिनिधी

सांगली : मंत्र्यांना बायको किंवा मेहुणा अडचणीत आणतो. नाही तर चहापेक्षा केटली गरम असलेला पीए अडचणीत आणतो, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.सांगली येथील पीएनजी सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिनात खुमासदार शैलीत भाष्य करत काही किस्से सांगितले.Nitin Gadkari says ministers get in trouble with wife or brother-in-law, PA is kettle hotter than tea

ते म्हणाले, माझा अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत बायको नाहीतर मेहुणा अडचणीत आणतो. नाहीतर चहापेक्षा किटली गरम म्हणजे खाजगी सचिव. मी माझ्या मेहुण्याला तुझे काम असेल तरच माझ्याकडे ये असे सांगितले. लोकांचे काम घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही. तू या भानगडीत पडायचे नाही,.सासºयांच्या भिंत बायकोला जेव्हा न सांगता कशी तोडली याचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. मी फुकट नाटक कधी बघत नाही. नाट्य निमार्ते कर्ज काढून नाटक बसवतात. त्यामुळे मी कधीच फुकट नाटक बघत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, मी पण पर्यावरणवादी आहे. आम्ही पर्यावरणच्या विरोधात नाही. मी इंजिनिअर पण नाही आणि आर्किटेक्ट पण नाही. मी सिनेमा समोरुन आणि नाटक मागून पाहतो. मी कुणाला ही कधी हार घालत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांनाच फक्त माझ्या पैशातून हार घातला. जे मत देतील त्याचेही काम करतो आणि जे मतदान करत नाहीत त्यांचेही काम करतो. कारण मंत्री हा सर्वांचा असतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari says ministers get in trouble with wife or brother-in-law, PA is kettle hotter than tea

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती