दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे अवघ्या १२ तासात दिल्ली NITIN GADKARI: NH48 Mumbai-Delhi in 12 hours; Nitin Gadkari’s ambitious plan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीला जाण्यासाठीचा वेळ आता नितीन गडकरींच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्यावर आला आहे.आता दिल्लीला पोहोचण्यास १२ तासात लागणार आहेत. NH 48 मुळे हे शक्य होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्वकांक्षी योजनेचं चार वर्षांपूर्वीच देशाला स्वप्न दाखविलं होतं. आता अवघ्या एका वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे.
यातील अर्ध्याधिक महामार्गाचे काम पुर्णत्वास असून महाराष्ट्राच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंकलेश्वरपर्यंत हा महामार्ग मार्च 2022 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली-मुंबई या दोन मोठ्या शहरातील अंतर अर्ध्या दिवसांवर येणार आहे.
हवाई वाहतुकीनंतर रेल्वे व त्यानंतर आता महामार्गानेही दिल्ली खरंच बहुत दूर असणार नाही. प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी 98 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षि्त आहे. मार्च 2023 मध्ये हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली-जोधपूर-लासलोट आणि बडोदा-अंकलेश्वर या दरम्यान येत्या वर्षात मार्च 2022 मध्ये हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 1380 किमी असलेला हा द्रुतगती महामार्ग 8 लेनचा आहे आणि भविष्यातील गरज ओळखून तो 12 लेनपर्यंत वाढविता येईल. तो दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यातून जाईल. त्यामुळे देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी दिल्ली-मुंबईचं अंतर १२ तासांवर येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App