WATCH : नितेश राणे यांची बदनामी करणारा बॅनर उतरवला पोलिसांकडून राडा टाळण्यासाठी कारवाई


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांमुळे शिवसेना आणि राणेसमर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचा बदनामीकारक बॅनर आज ठाण्यात उभारला आणि शिवसैनिक आणि राणे हा वाद पुन्हा उफाळून आला.Nitesh Ranes Defamer banner was finally taken down by the police

पोलिसांनी त्वरित कारवाई करत सदर बॅनर खाली उतरवला.एकेकाळी शिवसेनेकडून राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नारायण राणे आणि शिवसेनेमधून आता विस्तव देखील जात नाही. दोन्ही कडची मंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्याचा एकही संधी सोडत नाहीत.



त्यातच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांवेळी झालेल्या राड्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

त्यानंतर आज नितेश राणे यांची बदनामी करणारा बॅनर ठाण्यात झळकल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सदर वादग्रस्त बॅनर लावण्यात आला होता. पोलिसांनी तो वेळेत उतरवल्याने तणाव फळाचा निवळला आहे, असे चित्र आहे.

  •  नितेश राणे यांची बदनामी करणारा बॅनर उतरवला
  •  पोलिसांकडून राडा टाळण्यासाठी कारवाई
  • बॅनर आज ठाण्यात उभारला होता
  •  शिवसैनिक आणि राणे हा वाद पुन्हा उफाळून आला
  •  सिंधदुर्ग बँक निवडणुकीचे पडसाद

Nitesh Ranes Defamer banner was finally taken down by the police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात