MUMBAI : ‘नितेश राणे हरवले आहेत शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस’ ; चर्चगेट स्टेशनबाहेर लावला बॅनर


नितेश राणे कुठे आहेत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे.MUMBAI: ‘Nitesh Rane loses chicken reward to finder’; Banner hung outside Churchgate station


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटांमध्ये राडा पाहायला मिळाला.तसेच संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत.दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो लावला आहे.

तसेच ते हरवले असल्याची माहिती बॅनरवर लिहिण्यात आली आहे.त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असे देखील लिहिण्यात आले आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे,याबाबत काहीही उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान हे बॅनर कोणी लावले असतील, यामगचा सूत्रधार कोण असेल,याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.संतोष परब हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे नॉटरिचेबल आहेत.

नितेश राणे कुठे आहेत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे.तसेच नाराणय राणे यांच्या घरावर देखील पोलिसांनी नोटीस लावली होती.परंतु राणेंच्या घरातील कर्मचाऱ्याने ती नोटीस काढून टाकली.

MUMBAI: ‘Nitesh Rane loses chicken reward to finder’; Banner hung outside Churchgate station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण