महाराष्ट्रात कायद्यात बदलाची तयारी पण ममतांनी थेट कुलगुरूंच्या नियुक्तीच टाकल्या करून, राज्यपालांनी दिली कारवाईचा इशारा


विशेष प्रतिनिधी

कोलकाता: कुलगुरूंची नियुक्ती आपल्या हातात यावी यासाठी महाराष्ट्रात विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आले आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हडेलहप्पी करता 24 सरकारी विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची नियुक्ती करून टाकली आहे. या नियुक्तया बेकायदेशीरपणे करण्यात आल्या आहेत. त्यांना परत बोलावले नाही तर कारवाई करण्याचा इशारा दिला राज्यपाल जगदीप धनखर यांनी दिला आहे.Maharashtra prepares for change in law, but Mamata hits direct on Vice-Chancellor, The governor warned of action

राज्यपालांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 24 विद्यापीठांच्या कुलगुरूंची ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाने कायद्याची अवहेलना करून नियुक्ती केली आहे. कुलपतींच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे. या नियुक्त्यांना कोणतीही कायदेशीर मान्यता नाही आणि लवकरच परत बोलावल्याशिवाय कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.भारताचे राष्ट्रपती बहुतेक केंद्रीय विद्यापीठांचे कुलपती असताना, राज्यपाल हे राज्य-संचलित विद्यापीठांचे कुलपती असतात. या अधिकारांचा संकोच केल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी धनखर यांच्यावर हल्ला चढवत म्हटले आहे की ते त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर काम करत आहेत.राज्यपाल कोण आहे? ते घटनात्मक प्रमुख आहेत. राज्य सरकार राज्यघटनेनुसार काम करत आहे की नाही हे पाहणे हे त्यांचे काम आहे.

मात्र, राज्यपाल त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर वागत आहेत. जणू काही आपल्याकडे निवडून आलेले सरकार नाही. तसे असेल तर कोणताही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नसावा आणि राष्ट्रपती आणि राज्यपालांना देशावर राज्य करू द्यावे.

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी मुख्यमंत्र्यांना राज्य-शासित विद्यापीठांचे अंतरिम कुलपती बनवण्याची सूचना केल्यानंतर एका आठवड्यानंतर धनखर यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर धनखर यांनी मुख्यमंत्र्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्याची सूचना करत उपहासात्मक टिप्पणी करत राज्य सरकारवर हल्ला चढवला होता.

धनखर यांचे नाव न घेता बसू यांनी गुरुवारी कवी सुकुमार रे यांची बंगाली कविता ट्विट केली. बसूने रे यांची व्यंगात्मक कविता लोराई ख्यापाचे (फाइट क्रेझी) आठ श्लोक पोस्ट केले, ज्यामध्ये कवी पगला जगाई (मॅडकॅप जगाई) च्या कृत्यांचे कथन करतो.राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील हा संघर्ष अनिष्ट आहे, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.

Maharashtra prepares for change in law, but Mamata hits direct on Vice-Chancellor, The governor warned of action

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण