“अकेला देवेंद्र क्या करेगा??” ते फडणवीस सर्वांना पोहोचवतील!!; राष्ट्रवादीच्या नेत्यांची फिरून गेली अडीचकी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातले अडीच वर्षांचे सरकार पाच महिन्यांपूर्वी बदलले काय!!, त्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची वैचारिक अडीचकी पार फिरवून टाकली आहे. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा भाजप – शिवसेना महायुतीचे बहुमत डावलून ठाकरे – पवारांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते, त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. आमच्या कडे तीन पक्ष आहेत. अकेला देवेंद्र क्या करेगा??, पण आता अडीच वर्षानंतर त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत, फडणवीसांचा भरवसा धरू नका. ते कधी पोहोचवून येतील, ते तुम्हाला समजणारही नाही!! NCP leaders feared devendra Fadanavis’s political overthrowing capacity after government changed in maharashtra

महाराष्ट्रातल्या सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हे बदललेले बोल आहेत. अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांनी महायुतीतून उद्धव ठाकरे यांची अखंड शिवसेना बाजूला काढण्याची किमया केली होती. त्यावेळी सर्वच मराठी माध्यमांनी पवारांचा महाचाणक्य म्हणून गौरव केला होता त्या “गौरवपूर्ण” वातावरणातच सुप्रिया सुळे यांनी आम्ही तीन पक्ष आहोत. अकेला देवेंद्र क्या करेगा!!, अशा शब्दात डिवचले होते. पण ते वातावरण अडीच वर्षच टिकले आणि अडीच वर्षांनंतर फिरले!! आता जयंत पाटलांनी फडणवीस काय चीज आहे, हे एका मुलाखतीत सांगून टाकले आहे. जयंत पाटील म्हणाले, बहुमत हातात होते.



फक्त शपथ घेणे बाकी होते. मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांना एवढे सोपे समजू नका. ते गोड बोलतात, गोड हसतात. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना लाईटली घेऊ नये. या सर्वांना ते कधी पोहोचवून येतील हे समजणारही नाही!! ही कोपरखळी म्हणे जयंत पाटलांनी भाजपच्या इतर नेत्यांना उद्देशून मारली. पण वास्तवात देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षातल्या सरकारच्या नेत्यांना कुठे पोहोचवले ते समजले आहे का??, हा खरा प्रश्न आहे.

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या प्रश्नाचे उत्तर या दोघांनाही माहिती नाही. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. अगोदर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जायचे. मात्र या सर्व लोकांनी फडणवीसांना यावेळी मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असे मिश्किल भाष्य जयंत पाटील यांनी केले.

आघाडीच्या मुख्यमंत्रीपदावरून कानावर हात

२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आले तर कोण मुख्यमंत्री होणार, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला. पण या प्रश्नाचे जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले नाही.

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील. ते ठरवण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे सांगून जयंत पाटलांनी वेळ मारून नेली.

NCP leaders feared devendra Fadanavis’s political overthrowing capacity after government changed in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात