NCP Leader rajkumar dhakane Expelled From State Police Compaint Authority : पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या समान अधिकार आहेत. या प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही पाठवलं होतं. नियमबाह्य नियुक्तीचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव राजकुमार ढाकणे असं आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर गृहविभागाने कारवाई करत राजकुमार ढाकणे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून हकालपट्टी केली आहे. NCP Leader rajkumar dhakane Expelled From State Police Compaint Authority After Lop Fadnavis Letter To CM Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या समान अधिकार आहेत. या प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही पाठवलं होतं. नियमबाह्य नियुक्तीचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव राजकुमार ढाकणे असं आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर गृहविभागाने कारवाई करत राजकुमार ढाकणे यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून हकालपट्टी केली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकुमार ढाकणे यांच्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपवला. या अहवालात राजकुमार ढाकणे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. यामुळे ढाकणे यांना तत्काळ प्राधिकरणावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. ढाकणे यांची 14 जुलै 2020 रोजी गृहविभागाने अधिसूचना जारी करत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती.
उद्योजक असणारे राजकुमार ढाकणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. 17 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. पुण्यातील येरवडा, गांधीनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, जयप्रकाश नगर याभागात त्यांचे वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत चौकशीची मागणी केली. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही पाठवलं होतं. त्यानंतर ढाकणे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. 2015 मध्ये राजकुमार ढाकणे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुण्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद असल्याचं अहवालात नमूद आहे.
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरील नियुक्तीला आक्षेप घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या समान अधिकार आहेत. संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांविरोधातील तक्रारींची निपटारा करण्यासाठी हे प्राधिकरण असल्याने यातील नियुक्त्या डोळ्यात तेल घालून व्हायला हव्यात. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नेमणूक होत असेल तर ते अतिशय गंभीर आणि पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे. सुमारे पावणे तीन लाख वेतन या पदासाठी आहे. गृहमंत्रालयाने विशेष अधिकार वापरून राजकुमार ढाकणेंची नियुक्ती केली आहे. हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्याची त्यांच्यावर नोंद आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचाही आरोप आहे. कुठलीही शहानिशा न करता ही नियुक्ती झाली कशी? असा सवाल फडणवीसांनी केला होता.
NCP Leader rajkumar dhakane Expelled From State Police Compaint Authority After Lop Fadnavis Letter To CM Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App