भोसरी जमीन घोटाळा भोवला; CD लावण्याची भाषा वापरणाऱ्या एकनाथ खडसेंच्या जावयाला ED ने केली अटक


वृत्तसंस्था

मुंबई : तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरणाऱ्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ED ने आज अटक केली. ज्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता, त्याच घोटाळ्याच्या प्रकरणात खडसेंच्या ED ने अटक केली आहे. NCP leader Eknath Khadse’s son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate

एकनाथ खडसे यांनी भाजपवर आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरली होती.

पण त्या भाषेचा काही उपयोग झालाच नाही. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना मोठा धक्का दिला आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.



गिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली.

याआधी ईडीने जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. खडसेंना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

ईडीने यावेळी एकनाथ खडसे अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार (ECIR) आरोपी नाहीत, मात्र जर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर अटक केली जाऊ शकते असे स्पष्ट केले होते. २०१८ मध्ये २२ पानांच्या रिपोर्टमध्ये एसीबीने एकनाथ खडसेंनी क्लीन चीट दिली होती.

एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा झाला. त्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आली होता.

NCP leader Eknath Khadse’s son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात