हसन मुश्रीफ म्हणाले- किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार, म्हणाले हे सर्व चंद्रकांत पाटलांच्या सांगण्यावरून


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे प्राप्तिकर विभागाला दिल्याचा दावा त्यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे. या आरोपांवर उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनीही सोमय्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.NCP Hasan Mushrif Comment On BJP Kirit Somayya Corruption Allegations

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

आपल्यावरील आरोप फेटाळत मुश्रीफ म्हणाले की, किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. मला त्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्रे दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणा भीमदेवी थाटात आरोप त्यांनी केला. माझ्यावर धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता सोमय्या आरोप करत आहेत.

मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खात्री करायला हवी होती.

मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार.

चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार आहे. समरजीत घाटगे यांचा पॅराही वेळच्या वेळी फोडू.घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसापासून याची चर्चा करत होते. म्हणून मीसुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं.

चंद्रकांत पाटलांचेही मुश्रीफांना प्रत्युत्तर

मुश्रीफांनी केलेल्या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. त्यांचं सरकार येऊन २० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही. हॅब्रीड अॅन्युइटीमध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली.

सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्षे ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्युइटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झाली. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही.

मागच्या टर्ममध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता, राष्ट्रवादीचे दोन आले. कालचक्र फिरत असतं आज आम्ही खाली असलो, तर उद्यावर येऊ. शिवसेना-भाजप युतीचे ८ आमदार आले. तुमचे किती होते? बंटी पाटील म्हणतात नामशेष करू.. पण जिल्हा परिषद वगैरे आमच्या ताब्यात आली.

खुलं चॅलेंज आहे, सुटे सुटे लढा, कोण एक नंबरला जातं ते बघू.. एकटं पोरगं चाललं होतं, त्याच्यावर तीन जणांनी हल्ला केला, कसल्या फुशारक्या मारता.मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाइट मनी आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

NCP Hasan Mushrif Comment On BJP Kirit Somayya Corruption Allegations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण