राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात


राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प आहेत. कॉँग्रेसचे नेते मात्र भाजपाविषयी काविळीने मैदानात उतरले आहेत.NCP calm, Congress in field for Anil Deshmukh


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाºयावर सोडून दिले आहे.

राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प आहेत. कॉँग्रेसचे नेते मात्र भाजपाविषयी काविळीने मैदानात उतरले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.



सीबीआयनंतर आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या कोणीही या प्रकरणावर बोलण्यास तयार नसताना काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे,असा आरोप केला आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडेले आहेत. याप्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत असून, आर्थिक व्यवहारासंदभार्तील आरोपांप्रकरणी ईडीने ईसीआयआर (गुन्हा) दाखल केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे.

करोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे. परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे, असे म्हटले आहे.

सावंत म्हणाले, आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकतेर्ही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती?

पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला? आणि जर पैसे दिले असे सीबीआय व ईडीचे म्हणणे असेल, तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.

NCP calm, Congress in field for Anil Deshmukh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात