राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही – अजित पवार


राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही. मात्र, नागरी सहकारी बँकेत पाव टक्केच घोटाळा होऊन ही त्याबाबत मोठा गाजावाजा करून बदनामी केली जाते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

पुणे – राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तीन हजार 766 प्रकरणत 64 हजार 590 कोटींचा गैरव्यवहार सन 2018- 19 मध्ये झाला आहे. तर देशभरातील नागरी सहकारी बँकेत यादरम्यान 181 प्रकरणात 127 कोटी 70 लाखचा गैरव्यवहार झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही. मात्र, नागरी सहकारी बँकेत पाव टक्केच घोटाळा होऊन ही त्याबाबत मोठा गाजावाजा करून बदनामी केली जाते.Nationalised bank ९० % corruption but there is no any discussion about this scam says deputy chief minister Ajit Pawar



महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली, परंतु चौकशी अहवालात त्यांना कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे दिसून येत आहे. सहकारी बँकेतील चुकांना मी पाठीशी घालत नाही, मात्र एखाद्या प्रकरणावरून त्याची इतकी बदनामी केली जाते की संबंधित बँकांचे कारभार पाहणारे संचालक हे अकार्यक्षम, भ्रष्टाचारी असे बिंबवले जाते ही बाब योग्य नसल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी बँकांचा गौरव समारंभ बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, ॲड सुभाष मोहिते ,ऍड साहेबराव टकले, संगीता कांकरिया व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब शिंदे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी असोसिशनकडून राज्य शिखर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

पवार म्हणाले, खाजगी बँकेत साडेपाच हजार कोटींचा म्हणजेच साडेसात टक्के भ्रष्टाचार आहे. तर परदेशी बँकामध्ये ९.४ टक्के गैरव्यवहार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत घोटाळा असल्याचे सांगण्यात येते, मात्र बँकेवर प्रशासक असूनही बँकेला १४०० कोटींचा निव्वळ नफा झाला असून नेट प्रॉफिट ६०० कोटी पेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. सहकारी संस्था चालवताना काही चुका घडत असतात,

मात्र त्यातील त्रुटी दूर करून त्या संस्था टिकवल्या पाहिजेत आणि पुढे नेल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. राज्यात यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचे जे रोपटे लावले होते त्याचा आज वटवृक्ष झाल्याचे दिसून येत आहे. देशातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा मोठा असून राज्याच्या विकासात देखील सहकाराचे अनन्य साधारण महत्व आहे. सहकारी बँकांच्या समोर वेगवेगळी आव्हाने

 

असून सहकार क्षेत्र लोकाभिमुख, पारदर्शक, आधुनिक तंत्रज्ञान आधारित झाले पाहिजे यादृष्टीने आगामी काळात काम करण्यात यावे. देशपातळीवर केवळ सात ते आठ बँक ठेव इतरही राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याचा विचार आरबीआयच्या माध्यमातून समोर येत आहे. अशावेळी मोठी पोकळी बँकिंग क्षेत्रात निर्माण होईल त्याकरिता सहकार विभागाने तयार राहावे.

पाटील म्हणाले, सहकाराला ११० वर्षाची परंपरा असून राज्याचा विकास होण्यात सहकार खात्याचा मोठा वाटा आहे. अनेकांच्या जीवनात मूलभूत बदल बँकाच्या माध्यमातून झाले पण बँकाचे प्रश्न सोडवणे ही महत्वपूर्ण आहे. प्रशिक्षण असणे आवश्यक असून त्याद्वारे प्रगती साधली जाऊ शकते. सातत्याने सहकार क्षेत्रात बदल होत असतात.

राज्याचा सहकार विभाग सर्वांच्या पाठीशी उभा आहे. सहकार क्षेत्रात महिला आणि तरुण यांचा सहभाग कमी दिसून येतो तो आगामी काळात वाढला पाहिजे. असोसिएशन माध्यमातून कामातील चुका टाळण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.राजकारणात सहकार असावा परंतु सहकारात राजकारण नसावे. माझा धर्म सहकार, जात सहकार,राजकीय विचार ही सहकार आहे असे मत यावेळी अनास्कर यांनी व्यक्त केले.

Nationalised bank ९० % corruption but there is no any discussion about this scam says deputy chief minister Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात