भारताला कोणाला पराभूत करायचे नाही, तर जग जिंकायचे आहे; पुण्यतीर्थ सप्तर्षी सत्कार सोहळ्यात भैय्याजी जोशींचे उद्गार


दिलीपराव दीक्षित, सप्तर्षी आणि अरुंधती यांचा नाशिक मध्ये हृद्य सत्कार सोहळा

प्रतिनिधी

नाशिक : जगभरात भारताची ओळख अनेकांनी गुलाम देश म्हणून करून दिली. पण भारताची ती मूळ ओळख नाही, तर भारताची ओळख ही ज्ञान, भक्ती आणि कर्मशीलतेमुळे आहे. किंबहुना हीच भारताची खरी ओळख आहे. भारतापुढे खरे आव्हान ही ओळख
टिकविण्याचे आहे. भारताला जगात कोणालाही पराभूत करायचे नाही, तर सगळ्यांना जिंकायचे आहे आणि सर्वांना भारताच्या मार्गावर चालण्यासाठी मजबूर करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले. Nashik punyateerth award function : 7 saints were felicited for their contribution to society

नाशिक मधील ज्येष्ठ उद्योजक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागवत सृष्टीचे प्रणेते दिलीपदादा दीक्षित यांच्यासह सप्तर्षींच्या पुण्यतीर्थ सन्मान सोहळ्याप्रसंगी भैयाजी जोशी बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती राम भोगले समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविलेल्या तपस्वी सप्तर्षींचा आणि अरुंधतीचा सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात भैय्याजी जोशी यांनी भारताच्या खऱ्या ओळखी विषयी सविस्तर विवेचन केले. पाश्चिमात्य दृष्टिकोनातून भारताची ओळख आणि भारतीय दृष्टिकोनातून भारताची ओळख यातील भेद त्यांनी समजावून सांगितला. त्याचवेळी त्यांनी पराभूत करणे आणि जिंकणे यातले अंतर देखील विशद केले. कोणालाही शस्त्राने पराभूत करता येते. त्यामुळे भारताला कोणालाही पराभूत करायचे नाही, तर भारताला सगळ्यांना जिंकायचे आहे, ते हृदयाने म्हणजेच जिव्हाळ्याने जिंकायचे आहे. भारताचा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा मार्ग अंतिम दृष्ट्या मानव कल्याणाचा असल्याने सर्वांना भारताच्या मार्गाने चालण्यासाठी मजबूर करायचे आहे, असे प्रतिपादन भैय्याजी जोशी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, अमेरिका, युरोपियन देशांची ओळख भौतिक साधनसंपदेने होते, तर चीनची ओळख नवीन महासत्ता म्हणून पुढे येत आहे. मात्र भारताची खरी ओळख ही गेल्या 150 वर्षांत पुसली गेली. ती नव्याने स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारत ही ईश्वरनिष्ठांची भूमी आहे. संत महात्म्यांची भूमी आहे. येथे मोठमोठे संत महात्मे आणि त्यागमूर्ती होऊन गेले. ज्यांच्यात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. त्यांच्या त्यागातून भारताची उभारणी झाली आहे. पाश्चात्य देशांचे निकष हे माहिती तंत्रज्ञान, विकास, मानव निर्देशांक, दरडोई उत्पन्न यावर आधारित आहेत. हे सर्व निकष भारताच्या मूळ ओळखीला लागू होत नाहीत. भक्ती, ज्ञान वैराग्य आणि अध्यात्मचिंतन यातून भारताची जगाला पुन्हा ओळख होणार असल्याचे यावेळी भैयाजी जोशी यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना मुख्य सत्कारमूर्ती

ज्येष्ठ उद्योजक दिलीपदादा दीक्षित म्हणाले की, आज यशस्वी उद्योजक म्हणून ओळख असली तरी यात सर्व समाजाचे मोठे योगदान आहे. मूळात देव, देवतांच्या आणि संत महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेली नाशिकची भूमी ही सध्या वायनरींची भूमी म्हणून ओळखली जाते. नाशिकचे हे रुपड पालटायाचे असून श्रीमद्भागवतावर आधारित ही नगरी पुन्हा साकारायची आहे. हा आपला संकल्प आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी मुकुंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर बुलंगे, जयंत गायधनी, वैभव जोशी, प्रा. जयंत भातंबरेकर, स्वामी कंठानंद, भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, डॉ. विजय मालपाठक, डॉ. विनायक गोविलकर, दीपा बक्षी, जयंत ठोमरे, वृंदा लवाटे आदी उपस्थित होते.

 

Nashik punyateerth award function : 7 saints were felicited for their contribution to society

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात