गोमुत्र कसले शिंपडताय…??, बाळासाहेबांचे स्मारक जागतिक कीर्तीचे कसे होईल, ते पाहा; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी – जानव्यातले नाही, असे म्हणणाऱ्या शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची शुध्दी गोमुत्र शिंपडून केली. का… तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले…!! पण आता नारायण राणे यांनी शेलक्या शब्दांमध्ये या गोमुत्रावरून शिवसेनेला सटकावले आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमुत्र कसले शिंपडताय… ते स्मृतिस्थळ जागतिक कीर्तीचे कसे होईल ते पाहा ना…!! Narayan Rane targets shivsena over cow uriniting Balasaheb Thackeray`s Memorial

नारायण राणे म्हणाले, की मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसे वाटते, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यावर कोणाला गोमूत्र शिंपडायचे शिंपडू द्या, कोणाला प्यायचे त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडले म्हणून ? काय दूषित झाले होते?



एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या अवस्थेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की एवढाच जर त्यांना स्मारकाबद्दल आदर आहे, तर सध्या ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्यावे. पँट वर करून दलदलीतून तिथपर्यंत जावे लागते. मी अनेक स्मारके पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असते, सुशोभीकरण केलेले असतं. झाडे असतात. बाळासाहेबांच्या जागतिक कीर्तीच्या नेत्याच्या स्मृतिस्थळापाशी काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले होते ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचे कसे होईल याकडे लक्ष द्यावे, हेच माझं त्यांना उत्तर आहे.

Narayan Rane targets shivsena over cow uriniting Balasaheb Thackeray`s Memorial

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात