विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुढे गेल्याने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चांगलीच सटकली आहे. यासाठी पक्षांतर्गत विरोधक जबाबदार असल्याचा संशय असल्याने त्यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे.Nana Patoles warning to teach a lesson to the opponents within the party
राज्यपालांनी सही न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली. पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे’ असा इशाराच त्यामुळे पटोले यांनी दिला आहे. पटोले यांनी इशारा दिल्यामुळे पक्षातील विरोधक कोण आहे, अशी चर्चा रंगली आहे.
नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण सोनिया गांधी यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी पक्षातील विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे. ते म्हणाले,
भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला आलो होतो, पण काही कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्या नाराज नाही. काही कारणाने भेट झाली नाही.
‘पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसचाच अध्यक्ष होईल,असे पटोले यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App