NAMO : ‘रोम’ रोम मे मोदी ! इटलीत मराठीचा डंका! पंतप्रधान मोदींना भेटले नागपूरकर ‘माही’ गुरूजी ; मोदींनी प्रेमाने मराठीत केली विचारपूस…


विशेष प्रतिनिधी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर आहेत. ते जेथे जातात तेथे त्यांच्या भोवती लोकांचा गराडा असतो..मग ते अमेरिकेत असो वा इटलीत ….NAMO: ‘Rome’ Modi in Rome! Danka of Marathi in Italy! Nagpur ‘Mahi’ Guruji meets PM Modi; Modi lovingly interviewed in Marathi …

इटलीमध्ये त्यांच असचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आलं .तिथे भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक भाषेत बोलणारे लोक मोदींना भेटले.त्या सर्वांसह मोदींनी त्यांच्या त्यांच्या भाषेत संवाद साधला.प्रेमाने विचारपूस देखील केली.

असाच एक नागपूरकर माणूस भेटला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. माजी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. ‘रोम’च्या रोमा रोमात वसले आहेत नरेंद्र मोदी असं कॅप्शन देऊन हा व्हीडिओ त्यांनी ट्विट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.



काय आहे व्हीडिओत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोमच्या दौऱ्यावर असताना काही भारतीय त्यांच्यासमोर शंकराचं स्तोत्र म्हणतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतपणे ऐकतात. त्यानंतर हे भारतीय भारतमाता की जय अशा घोषणा देतात. मोदी त्यांना भेटत असतानाच त्यांना या सगळ्यांमधला एकजण म्हणतो, मोदीजी नमस्कार सर मी नागपूरचा आहे. लगेच मोदी म्हणतात ‘तुम्ही नागपूरचे? काय नाव तुमचं? ‘

माझं नाव माही गुरूजी मागच्या २२ वर्षांपासून मी इथे राहतो आहे. त्यानंतर मोदी त्याच्याशी हस्तांदोलन करतात आणि पुढे जातात. तिथेही त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमलेली असतेच. मग ते भारतमाता की जय असा नारा देतात. त्यांच्या पाठोपाठ इतर भारतीयही हाच नारा देतात. असं या व्हीडिओत आहे.

नागपूरचा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीतल्या रोम शहरात भेटला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला ही बाब नागपूरकरांसाठीही खास आहे आणि आपल्या राज्यासाठीही. या व्हीडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोण आहेत माही गुरूजी?

माही गुरूजींचं नाव महेंद्र सिरसाठ असं आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पोलीस दलात एएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचे कुटुंबी सीताबर्डी येथील क्वार्टर राहात होते. 22 वर्षांपूर्वी ते कामानिमित्त इटलीला गेले होते. त्यावेळी या देशात भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद उपचार पद्धती यांचा प्रचार आणि प्रसार करावा असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते तेव्हापासून इटलीतच स्थायिक झाले आहेत.

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात इटलीला सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी माही गुरूजी यांच्या केंद्रातील साधक हे या जीवघेण्या आजारापासून सुखरूप होते. योग आणि आयुर्वेदामुळे कोरोनापासून सुरक्षित राहात असल्याचा संदेश त्यांनी दिला. इटलीतल्या नागरिकांची योग प्रशिक्षणाद्वारे त्यांनी सेवा केली होती

NAMO: ‘Rome’ Modi in Rome! Danka of Marathi in Italy! Nagpur ‘Mahi’ Guruji meets PM Modi; Modi lovingly interviewed in Marathi …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात