अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. Nagpur: Five vehicles of the fire brigade arrived at the warehouse of Reliance Retail in Nimchi village; No casualties were reported
विशेष प्रतिनिधी
नागपूर : गुरुवारी ( आज ) नागपूरच्या निमची गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गोदामात रिलायन्स स्टोअरमधून विकले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे.दरम्यान आगीत ते जळून खाक झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे.दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App